अर्शिन कुलकर्णीच्या अष्टपैलू खेळीने नाशिक टायटंसचा पुणेरी बाप्पा वर विजय

Ashwin Jangam

Ashwin Jangam

June 20, 2023

Go To All Posts

महाराष्ट्र प्रीमियर लीग आता जोर पकडत आहे. अनेक नवनवीन युवा खेळाडूंची महाराष्ट्राला नव्याने ओळख होत आहे. ऋतुराज, केदार जाधव, राहुल त्रिपाठी यांच्यासारखे मोठे खेळाडूंची नावं सर्वांनाच माहित आहेत, पण प्रीतम पाटील, अंकित बावणे, धनराज शिंदे, पवन शाह यासारखे अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंना नव्याने पाहून महाराष्ट्र सुखावत आहे. आणि या नावात काळ भर पडली ती एका 19 वर्षीय युवा खेळाडूची.

Blog Post Image

अर्शिन कुलकर्णी, कदाचित हे नाव आधी ऐकलं असेल. आणि जर चुकून ऐकलं नसेल तर आता हे नाव कोणी विसरणार नाही. 19 वर्षीय अर्शिनने काल आपल्या अष्टपैलू खेळाने बलाढ्य पुणेरी बाप्पा संघाला एकहाती टक्कर देत सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवला. फलंदाजी करताना त्याने 54 चेंडूत 117 धावा करत तेजतर्रार शतक केले, आणि गोलंदाजी करताना त्याने पुणेरी बाप्पा च्या 4 फलंदाजांना बाद केले करून ईगल नाशिक टायटंसना विजय मिळवून दिला.

Blog Post Image

सलामीला आलेल्या अर्शिनने सावध सुरुवात करत योग्य वेळ पाहून आक्रमण करण्यास सुरू केलं. तब्बल 13 षटकार मारत त्याने गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याची फटकेबाजी इतकी सुरेख होती की अनुभवी राहुल त्रिपाठी सावध खेळून अर्शिनला स्ट्राइक देत होता. त्याच्या 117 च्या अप्रतिम खेळीच्या जोरावर नाशिक संघाने 203 धावांचा डोंगर उभा केला.

Blog Post Image

त्याचा पाठलाग करताना पुणेरी बाप्पाच्या सर्व फलंदाजांनी जीव ओतून फलंदाजी केली. आणि हे होत असताना पुन्हा एकदा अर्शिने चांगल्या लयीत असलेल्या यश क्षीरसागर ला बाद केले. नंतर सूरज शिंदे यालाही त्यानेच बाद केले. पुढे पुणेरी बाप्पाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने तेजतर्रार अर्धशतक करत सामना आपल्या बाजूला वळवला, आणि तो बाद झाला. सामन्यावर पुणेरी बाप्पाची पकड असताना शेवटचे षटक टाकायला पुन्हा अर्शिन आला , आणि समोरच्या संघाला कमी धावसंख्या हवी असताना त्यांचे 2 बळी घेत 1 रन ने हा सामना ईगल नाशिक टायटंसने आपल्या नावावर केला.

Blog Post Image

अर्शिनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर नाशिक ने पुणेरी बाप्पा सारख्या मोठ्या संघावर विजय मिळवला. त्याची ही अष्टपैलू खेळी पाहून आयपीएल मधल्या पॉल वलथाती ची आठवण आली, ज्याने एकाच सामन्यात 120 धावा करून, चेन्नई संघाचे 4 गडी ही बाद केले. असे खेळाडू आणि अश्या अप्रतिम खेळी प्रेक्षकांना कायमच लक्षात राहतात. महाराष्ट्र प्रीमियर लीग ने अश्या खेळाडूंना नावलौकिक दिला, आणि आशा करूया की असे अनेक अप्रतिम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. अर्शिन ला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा


Related Posts

June 14, 2023

महाराष्ट्र प्रीमियर लीग : एक सुरुवात

June 13, 2023

Is IPL really the culprit behind the ICC tournament's failure for India?

June 16, 2023

महाराष्ट्र प्रिमियर लीगची धमाकेदार सुरुवात

Comments (1)


Bonnie GreenAparna Dabke

June 23, 2023

Great, Ashwin Hats Off 👍🏻👍🏻👍🏻

Bonnie Green

Ashwin Jangam (Author)
Reply

June 30, 2023

Thank you ☺️